फाश्यात अडकलेल्या बिबट्यासह भेटा तीन नव्या बछड्यांना

नाशिकहून आईपासून अलिप्त झालेल्या तीन बिबट्यांच्या बछड्यांना अखेर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रात शुक्रवारी कायमस्वरुपी पाठवले गेले. दोन मादी आणि एका नर बिबट्याच्या बछड्यासह आता बिबट्या पुनर्वसन केंद्रातील बिबट्यांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

जेरंबद करुन उपचारांसाठी पुनर्वसन केंद्रात

तीन आठवड्यांअगोदर डहाणूतील एका जखमी बिबट्याला जेरबंद करुन बिबट्या पुनर्वसन केंद्रात उपचारांसाठी पाठवले गेले. साधारणतः ४ ते ५ वर्षांच्या बिबट्याने फाश्यात अडकल्यानंतर धडपडत शिका-यांच्या तावडीतून सुटका केली खरी परंतु बिबट्याला जखमा झाल्या. डहाणूत जखमी बिबट्याकडून पाळीव प्राणी मारले जात असल्याने अखेर लोकांच्या तक्रारी वाढल्या. परिणामी, वनविभागाने त्याला जेरंबद करुन उपचारांसाठी बिबट्या पुनर्वसन केंद्रात पाठवले. बिबट्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, असे वाघ-सिंह सफारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी सांगितले.

( हेही वाचा : समाजशास्त्राचे पदवीधर आहात का? महापालिकेत आहे ही संधी, जाणून घ्या)

नाशिकहून दोन महिन्यांपूर्वी आईपासून दूरावलेले तीन बछडे सापडले. त्यांचे आपल्या आईशी मिलन व्हावे यासाठी अकरा दिवस वनाधिका-यांना प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. त्यांना पुण्यातील खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारासाठी पाठवले गेले. उपचारानंतर त्यांना बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्याचा निर्णय झाला. अखेर शुक्रवारी पुण्यातून दोन महिन्यांच्या बछड्यांना मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले गेले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here