बदलापूरमध्ये कोंडेश्वर मंदिराजवळील धबधब्यात ४ मुलं बुडाली

173

बदलापूरयेथील कोंडेश्वर धबधब्यामध्ये ४ अल्पवयीन मुले बुडाल्याची घटना समोर आली आहे. कोंडेश्वर मंदिराच्या मागे धबधब्याच्या कुंडात ही चारही मुलं बुडाली. चौघेही घाटकोपर परिसरात राहणारे असून ते पिकनिकसाठी कोंडेश्वरला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चौघांचे मृतदेह सापडले असून रुग्णालयात पाठवले आहेत. या मुलांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

( हेही वाचा : ‘पार्टी पॅक’ इन्स्टाग्रामवरील ऑनलाइन ड्रग्स विक्रीचा ग्रुप )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.