धक्कादायक! पुण्यापाठोपाठ आता ‘या’ महानगरात BA व्हेरीएंट

पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही बीए व्हेरीएंटचे रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यभरात सर्वात जास्त कोरोना रुग्णसंख्या मुंबईत असताना आता ओमायक्रॉनच्या बीए 4 आणि बीए 5 या उपप्रकारचे चार रुग्ण मुंबईत सापडले आहेत.

मुंबईत बीए व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याची भीती

या दोन्ही विषाणूंचा फैलाव वेगाने होत असल्याने मुंबईत बीए व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 14 मे ते 24 मे दरम्यान बीए 4 व्हेरीएंटचे 3 तर बीए 5 ची बाधा झालेला एक रुग्ण मुंबईत आढळून आला. त्यामुळे मुंबईकरांची चिंता अधिक वाढली आहे.

आजही 1,118 नवे कोरोनाचे रुग्ण

बीए 4 व्हेरीएंटचे 3 आणि बीए 5 ची बाधा झालेल्या रूग्णांमध्ये 11 वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. उर्वरित दोन रुग्ण 40 ते 60 वयोगटातील दोन पुरुष असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. चारही रुग्ण घरगुती विलगीकरणात उपचार घेत होत. यादरम्यान ते रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सोमवारही 1 हजार 118 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आता मुंबईत 11 हजार 331 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here