एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षाअखेरीस तब्बल चार हजार बसगाड्यांचा ताफा दाखल होणार आहे. एसटी महामंडळाच्या सोमवारी झालेल्या संचालक महामंडळाच्या बैठकीत चार हजार बस घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यात विजेवर धावणाऱ्या दोन हजार बसेसचा समावेश असेल. या बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : Atal Pension Yojana : महिन्याला भरा फक्त २१० रुपये! निवृत्तीनंतर होणार मोठा फायदा )
ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १६ हजार बस आहेत. यापूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसगाड्या होत्या मात्र गेल्या तीन वर्षात नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत आणि जुन्या गाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या आता कमी झालेली आहे. परिणामी सध्या एसटीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार चार हजार बसगाड्या घेण्याच्या प्रस्तावाला महामंडाळाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली.
प्रदुषणमुक्त प्रवासासाठी प्रयत्न
यामध्ये प्रदुषणमुक्त प्रवासासाठी विजेवर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश असेल तसेच इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने ताफ्यातील एक हजार बस सीएनजीत परावर्तित करण्याता निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी दोन हजार सीएनजी बस खरेदी करणार आहेत. केंद्र सरकारच्या फेम या योजनेअंतर्गत टप्याटप्याने १५० बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. पहिल्या टप्यात महामंडळाला ५० ई-बस मिळतील यातील दोन बसेस सध्या पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावत आहेत.
Join Our WhatsApp Community