रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतात जागोजागी विस्तारलेले आहे. रेल्वे प्रकल्पांचा राज्यांच्या सीमांपलीकडे विस्तार करायचा असल्यामुळे रेल्वे प्रकल्प राज्यनिहाय मंजूर केले जात नाहीत, तर ते विभागीय रेल्वेनिहाय प्रकल्प मंजूर केले जातात. १ एप्रिल २०२१ पर्यंत, ५१ हजार १६५ किमी लांबीचे, अंदाजे ७.५३ लाख कोटी खर्चाचे ४८४ रेल्वे प्रकल्प योजना या मंजुरी, अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत, त्यापैकी १० हजार ६३८ किमी लांबीच्या प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे आणि या मार्च २०२१ पर्यंत अंदाजे २.१४ लाख कोटी खर्च झाले आहेत.
रेल्वे प्रकल्प विविध टप्प्यात
२१ हजार ३७ किमी लांबीचे १८७ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम सुरू असून यासाठी आजवर ४ लाख ५ हजार ९१६ कोटी खर्च झाले आहेत. त्यापैकी २ हजार ६२१ किमी लांबीच्या रेल्वे प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. ६ हजार २१३ किमी लांबीचे ४६ रेल्वे रूळ रूपांतरण प्रकल्प सुरू असून यासाठी ५३ हजार १७१ कोटी खर्च झाले आहेत. त्यापैकी ३ हजार ५८७ किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. आणि मार्च, २०२१ पर्यंत १ लाख ५ हजार ५९१ कोटी रुपये खर्च झाला आहे. २ लाख ९३ हजार ४७१ कोटी खर्चाचे, २३ हजार ९१५ किमी लांबीच्या २५१ दुहेरीकरण प्रकल्पाचे, ४ हजार ४३० किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. मार्च, २०२१ पर्यंत यासाठी ८६ हजार ४१ कोटी रुपये खर्च झाला आहे.
( हेही वाचा : आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल नरवणे? )
मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
किंमत, खर्च आणि परिव्यय यासह रेल्वे प्रकल्पांचे क्षेत्रीय रेल्वेनुसार तपशील हे, भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिले आहेत. केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Join Our WhatsApp Community