यंदा सर्वोच्च नागरी सन्मानासाठी ५ व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. (Bharat Ratna) आजच्या तीन नावांपूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर (Karpuri Thakur) आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी (LK Advani) यांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. गेली काही वर्षे साधारण तिघांना भारतरत्न दिला गेला आहे. यंदा ५ मान्यवरांना भारतरत्न घोषित केला गेला आहे. साधारण १५ दिवसांतच ५ जणांना भारतरत्न घोषित झाला आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया काय आहेत भारतरत्नचा इतिहास आणि त्याच्याशी जोडलेल्या काही रंजक गोष्टी –
(हेही वाचा – Maulana Taukir Raza : आमच्यावर आक्रमण करणाऱ्यांना ठार करू; मौलाना तौकिर रजा यांचा ज्ञानवापी प्रकरणी थयथयाट)
- तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) यांनी 2 जानेवारी 1954 रोजी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात केली.
- हा पुरस्कार जात, व्यवसाय, पद किंवा लिंग यांचा विचार न करता कोणतीही व्यक्ती या सन्मानासाठी पात्र आहे.
- मानवी कल्याणासाठी प्रयत्न करणाऱ्या, तसेच कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्तरावरील अपवादात्मक सेवा / कार्यक्षमतेची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो.
- भारतरत्नसाठी शिफारसी पंतप्रधान स्वतः राष्ट्रपतींकडे करतात. यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारसींची आवश्यकता नाही.
- पुरस्कार सादर केल्यावर, प्राप्तकर्त्यास राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे सनद (प्रमाणपत्र) आणि एक पदक प्राप्त होते. पुरस्कारासाठी कोणतेही आर्थिक अनुदान दिले जात नाही.
- खरं तर एका वर्षात तीन भारतरत्न प्रदान केले गेले आहेत. मात्र तसा कुठलाही नियम नाही. केंद्र सरकारने ठरविले, तर ते कितीही भारतरत्न प्रदान करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी ट्विट करून तीन व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली. यामध्ये शेतकरी नेते आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh), काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव (PV Narasimha Rao) आणि कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांचा समावेश आहे. यापूर्वी 23 जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि 3 फेब्रुवारी रोजी देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची घोषणा करण्यात आली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community