मुंबई गुन्हे शाखेने रविवारी, २१ नोव्हेंबर रोजी अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली. त्यामध्ये ५ कोटींचा ड्रग्स गुन्हे शाखेने जप्त केला आहे. शिवडी परिसरातील आणिक आगार परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
5 किलो 900 ग्रॅम अमली पदार्थांचा साठा
गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 5 किलो 900 ग्रॅम अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे, त्याची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. यात एमडी आणि काही प्रमाणात कोकेनचा समावेश आहे. महिलांच्या वापरात असणाऱ्या पर्सच्या माध्यमातून ही ड्रग्स तस्करी करण्याचा प्रयत्न होता. जप्त केलेल्या ड्रग्समध्ये 5 कोटी रुपयांची एमडी आणि 40 लाख रुपयांचा कोकेन जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात ड्रग्स विरोधी कारवाया केल्या आहेत. गेल्या वर्षभरात 500 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. वर्षभरात 620 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 4000 किलो ड्रग्स जप्त केले आहे.
(हेही वाचा टिळक स्मारकाची कौलेही उडाली! साडेचार कोटी गेले कुठे?)
Join Our WhatsApp Community