पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरील डिलाईल रोड उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्याच्या कामासाठी ५ दिवसांचा रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – “मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार!” भाजपच्या अनिल बोंडेंना वाटणारे ‘ते’ मिशीवाले कोण?)
५ दिवस साडेतीन तासांचा ब्लॉक
हा ब्लॉक रविवारी रात्री १.२५ ते सोमवारी पहाटे ४.५५ वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यानंतर पुढील सलग ५ दिवस दररोज साडेतीन तासांचा हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
लोकल्सच्या वेळात बदल
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विरार-चर्चगेट लोकल रद्द केली आहे. त्याऐवजी विरार स्थानकातून रात्री १२.०५ वाजेची चर्चगेटकरिता स्पेशल जलद लोकल धावणार आहे. चर्चगेट ते विरार पहाटे ४.१५ ची लोकल चर्चगेट ते दादरदरम्यान रद्द करून दादर ते विरार, तर चर्चगेट ते बोरिवली पहाटे ४.३८ ची लोकल चर्चगेट ते बांद्रादरम्यान रद्द करून बांद्रा ते बोरिवलीदरम्यान चालवण्यात येणार आहे. तसेच १.१९ ची चर्टगेट ते बोरिवली, पहाटे ५.३१ ची बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द करण्यात आली आहे. विरार ते चर्चगेट, बोरिवली ते चर्चगेट, भाईंदर या लोकल्सच्या वेळात बदल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community