पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जण ठार, कुटुंबियांना पाच लाखांची मदत

127

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

असा घडला प्रकार

येरवडा येथील शास्त्रीनगर परिसरात एका बेसमेटमध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर स्लॅबला लागणारी लोखंडी जाळी कोसळून 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. घटनास्थळी येरवडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

(हेही वाचा – आता फास्टॅगही होणार बंद? जाणून घ्या कशी होणार टोलवसुली)

शास्त्रीनगर परिसरात वाडिया यांच्या एका इमारतीच्या शेजारी बेसमेटचे काम करण्यात येत आहे. दरम्यान बेसमेंटला स्लॅब टाकण्याची तयारी केली जात होती. यादरम्यान त्यावर स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी जाळीचे कडे करण्यात आले होते. 16 एमएम गजाचे ही भली मोठी जाळी होती. दरम्यान, रात्री काही कामगार या बेसमेटमध्ये काम करत होते. तर ही जाळी त्याठिकाणी उभी करून ठेवण्यात आली होती. मात्र अचानक ही जाळी निसटली आणि या कामगारांच्या अंगावर पडली. लोखंडी जाळी असल्याने जबर मार लागला. तर काही गज या कामगारांच्या शरीरात घुसले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.