मोठी बातमी! वांद्रे परिसरात इमारत कोसळली

मुंबईतील वांद्रे परिसरात बुधवारी एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दूर्घटनेत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

शोधकार्य सुरु

बांद्रे पूर्व येथे रझा मस्जिदीजवळ असणारी पाच मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घेटनेत 6 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.  वाचवण्यात आलेल्या सहा लोकांंमधील चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात 2 पुरुष, दोन महिला यांना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारही जणांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, एक रेस्क्यू व्हॅन आणि सहा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. शोधकार्य अजून सुरु आहे.

( हेही वाचा: प्रजासत्ताक दिनी राजपथावर पहा देशाचे सामर्थ्य, यंदाचे संचलन आहे खास ! )

जखमींची प्रकृती स्थिर

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना व्ही. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींमध्ये नाहिद परवीन शेख, नगमा शाहीर शेख, मोहम्मद नसीम खान, मोहम्मद अकीब मोहम्मद शाहीर हुसैन या जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाभा रुग्णालयातील जावेद मोहम्मद युनुस, नाजिया मोहम्मद झाकीर हुसैन आणि संतोष कुमार मोंडल या जखमींची प्रकृतीही स्थिर आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here