अर्थसंकल्पापूर्वी Google वर सर्च होत आहेत या 5 गोष्टी; जाणून घ्या सविस्तर

126

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या आयपॅडमधून काय निघणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. अर्थसंकल्पापूर्वी सामान्य नागरिकांच्या गुगलवर काय सर्च करत आहेत ते जाणून घ्या.

अर्थसंकल्पाचा अर्थ

नागरिक बजेट 2023 म्हणजे अर्थसंकल्पाचा अर्थ काय हे जास्तीत जास्त सर्च करत आहेत. सर्वसामान्य लोकांना बजेटमध्ये नेमके काय ते जाणून घ्यायचे आहे.

बजेटचे प्रकार

बजेटच्या अर्थाशिवाय सर्वसामान्य गुगलवर बजेटचे प्रकार किती याबाबत सर्च करत आहेत. बजेटचे प्रकार, 3 असतात. पहिला – संतुलित बजेट: ज्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न आणि खर्च समान असतो.
दुसरा प्रकार- सरप्लस बजेट: ज्यात सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते. तिसरा प्रकार- डेफिसिट बजेट: ज्यात सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त असतो.

अर्थसंकल्पीय सत्र 2023

या दोन गोष्टींशिवाय तिसरी सर्च होणारी गोष्ट आहे अर्थसंकल्पीय सत्र 2023, तर या  अर्थसंकल्पीय सत्र 2023 ला मंगळवारी 31 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने सुरुवात झाली.

बजेट 2023 तारीख

सर्वसामान्यांना काय स्वस्त आणि काय महाग होणार ते जाणून घ्यायचे असते. शिवाय व्यावसायिक आणि नोकरदार, शेतकरी, महिलांना काय फायदा होणार आहे हे जाणून घ्यायचे असते. त्यामुळे गुगलवर चौथ्या क्रमांकावर शोधले गेले ते म्हणजे बजेट 2023 ची तारीख

अर्थसंकल्प 2023 च्या अपेक्षा

गुगलवर पाचव्या क्रमांकावर सगळ्यात जास्त शोधले गेले ते म्हणजे अपेक्षा. सामान्य लोकांना बजेटकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे ते Google वर देखील शोध घेतात. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांनाही दिलासा मिळण्याची आशा आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.