राज्यातील ५० टक्के जनावरे झाली लम्पीमुक्त

105

राज्यामध्ये ३ ऑक्टोबरपर्यंत ३१ जिल्ह्यांमधील २१५१ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील ४९ हजार ९५४ बाधित पशुधनापैकी २४ हजार ७९७ म्हणजे सुमारे ५० टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सोमवारी दिली.

( हेही वाचा : रशियाची समुद्रातून आण्विक हल्ल्याची तयारी?; ‘त्या’ पाणबुडीचा शोध सुरु )

विविध जिल्ह्यांमध्ये सोमवार अखेर १०९.३१ लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून १०५.६२ लाख जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगाव, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवार ३ ऑक्टोबर रोजी ६ लाख लस मात्रा प्राप्त झाल्या आहेत. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण या आकडेवारी नुसार सुमारे ७५.४९ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

३ ऑक्टोबरअखेर जळगाव ३२६, अहमदनगर २०१, धुळे ३०, अकोला ३०८, पुणे १२१, लातूर १९, औरंगाबाद ६०, बीड ६, सातारा १४४, बुलडाणा २७०, अमरावती १६८, उस्मानाबाद ६, कोल्हापूर ९७, सांगली १९, यवतमाळ २, सोलापूर २२, वाशिम २८, नाशिक ७, जालना १२, पालघर २, ठाणे २४, नांदेड १७, नागपूर ५, हिंगोली १, रायगड ४, नंदुरबार १५ व वर्धा २ अशा एकूण १९१६ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

लक्षणे ओळखा…

लक्षणे दिसल्यानंतर वेळेत उपचार सुरू झाल्यास लम्पी आजाराचा सामना करता येतो. या आजारात मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव पाहता सर्व पशुपालकांनी संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.