बांगलादेशातून आला, भारतात खुशाल राहिला, 10 लग्नेही केली, 100 प्रेयसींना फसवले आणि 5 हजार मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं इतकचं नव्हे, तर इंदूरला वेश्याव्यवसाय केंद्र उभारण्याची इच्छा असणारा नराधम नालासोपा-यात राहत होता. त्याला ब-याचदा अटक करण्याचा प्रयत्न केला गेला. पण प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा देणा-या या नराधमाला अखेर एसआयटी पथकाने अटक केली आहे.
नालासोपा-यात बनवला अड्डा
मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विजय कुमार दत्त यानं 5 हजारांहून अधिक मुलींना देहव्यापारात ढकलल्याची कबुली दिली आहे. 25 वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आलेला आरोपी विजय याने मुंबईतील नालासोपारा परिसरातील दाट वस्तीत आपला अड्डा बनवला होता. एसआयटीच्या पथकानं अखेर त्याला साथीदार बबलूसह बाणगंगा परिसरातील कालिंदी गोल्ड सिटी येथून अटक केली आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर सुरू असलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आले आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
आरोपी विजय हा उज्ज्वल, बबलू आणि सैजल या अन्य साथीदारांच्या मदतीने इंदूरला वेश्याव्यवसायाचं केंद्र बनवण्याच्या प्रयत्नात होता. इंदूरहून सुरत, राजस्थान, मुंबई आणि इतर प्रमुख ठिकाणी मुलींचा पुरवठा करणारी साखळी तयार करण्याचाही त्याचा प्रयत्न होता. आरोपी विजय कुमार गेल्या 25 वर्षांपासून मुंबईतील नालासोपारा परिसरातील दाट वस्तीत वास्तव्य करत होता. त्याने भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे देखील बनवली आहेत. तसेच बायकोला भेटायला जाण्याच्या निमित्तीने तो अनेकदा बांगलादेशला देखील ये-जा करत होता. बांगलादेशातील शबाना आणि बख्तियार यांच्या मदतीने गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून, भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलतं होता. तो नराधम त्या मुलींवर बलात्कारही करत होता. या पिडीत मुलींनी बांगलादेशात माघारी जायचे म्हटले की, त्यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकी हा नराधम देत होता.
अखेर जेरबंद करण्यात आलं यश
आरोपीनं गेल्या 25 वर्षांत अशाच प्रकारे जवळपास 5000 हून अधिक मुलींना वेश्याव्यावसायात ढकललं आहे. आरोपी विजय यानं आतापर्यंत 10 मुलींशी लग्न केलं आहे. तसेच त्याला 100 हून अधिक प्रेयसी आहेत. संबंधित सर्व प्रेयसींना आरोपीनं देहव्यापारात ढकललं असून, त्याचं कमिशनही स्वत:कडेच ठेवत होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिस आरोपीचा शोध घेत होते. पण प्रत्येक वेळी आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होतं होता. यावेळी पोलिसांनी नालासोपारा परिसरात धाड टाकल्यानंतर आरोपीनं इंदूरला पलायन केलं होतं. पण एसआयटी पथकाच्या मदतीनं आरोपीला जेरबंद करण्यात यश आलं आहे.