मुंबई उच्च न्यायालयात ५५ वर्षीय व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई उच्च न्यायालयात तुषार शिंदे नावाच्या ५५ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रसंगी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुषार शिंदे नाव असणाऱ्या व्यक्तीचे मुंबई उच्च न्यायालयात संपत्तीचे प्रकरण प्रलंबित आहे, त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. तर तुषार शिंदे हे निवृत्त सैनिक असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे घटना

मुंबई उच्च न्यायालयातील कोर्ट रूम क्रमांक ९ येथे न्यायमूर्ती प्रकाश नाईक हे न्यायालयात प्रकरण सादर करत होते. यावेळी संपत्तीच्या वादाचे प्रकरण सुरू होते. तेव्हा तेथे उपस्थितीत याचिकाकर्ता आणि या प्रकरणात प्रतिवादी असलेले तुषार शिंदे यांनी हा आत्महत्येचा प्रकार केला आहे. त्यांच्या घरातील संपत्तीच्या प्रकरणावर न्यायालयाने आई-वडिलांच्या बाजूने निकाल दिला. या निकालामुळे उद्विग्न होऊन तुषार शिंदे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – SSC Result 2022: निकालात मुलींची बाजी, कोकण सरस तर…राज्याचा एकूण निकाल किती?.)

यावेळी मुंबई उच्च न्यायालयात सुरक्षेसाठी असणारे पोलीस सतर्क होत त्यांनी तुषार शिंदेंना रोखल आणि मोठा अनर्थ न्यायालयात होताना टळला. न्यायालयातील परिसरात असणाऱ्या पोलिसांच्या चौकीत या व्यक्तीला नेण्यात आले आणि त्यांच्या समुपदेशनाचे काम सध्या केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here