पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने अंमली पदार्थमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अंमली पदार्थांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’अर्थात शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले आहे. 1 जून 2022 पासून सुरू झालेल्या 75 दिवसांच्या अभियानांतर्गत एकंदर 75,000 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले होते, मात्र आतापर्यंत प्रत्यक्षात 5,94,620 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून हा आकडा उद्दिष्टापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. तसेच नष्ट करण्यात आलेल्या एकूण जप्त अंमली पदार्थांपैकी 3,138 कोटी रुपयांचे 1,29,363 किलोग्राम अंमली पदार्थ एकट्या एनसीबीने नष्ट केले आहेत.
( हेही वाचा : वीर सावरकर अवमानप्रकरणाचे विधानसभेत पडसाद; कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने अंमली पदार्थांची समस्या सोडविण्यासाठी संस्थात्मक रचना मजबूत करणे, अंमली पदार्थ नियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांमध्ये समन्वय निर्माण करून त्यांचे सशक्तीकरण करणे आणि अंमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान हाती घेणे अशा त्रिसूत्रीचा स्वीकार केला आहे.
अंमली पदार्थांची तस्करी हा विषय केवळ केंद्राचा किंवा राज्यांचा विषय नसून तो राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच त्यावर उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आणि एकत्रित असले पाहिजेत. अंमली पदार्थांच्या धोक्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी, सर्व राज्यांनी नियमितपणे जिल्हा-स्तरीय आणि राज्य-स्तरीय राष्ट्रीय नारकोटिक्स समन्वय पोर्टल NCORD ची बैठक बोलावली पाहिजे असेही गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community