भारतात 5G क्रांती! पंतप्रधानांच्या हस्ते सुपरफास्ट सेवेचा शुभारंभ

161

भारतात शनिवार १ ऑक्टोबरपासून 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असून मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी ही सेवा लॉंच केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या 5G इंटरनेट लॉंच सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली आहे.

( हेही वाचा : पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल; मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी, एकूण फेऱ्यांची संख्या १३८३)

काय आहे 5G नेटवर्क?

सध्या बाजारात 2G ते 4G पर्यंत सिमकार्ड उपलब्ध आहेत. 4G वरून 5G सेवा अपग्रेड केल्यानंतर ग्राहकांना सिमकार्ड बदलावे लागणार नाही. ग्राहकांना त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरला कळवून 4G कनेक्शन थेट 5G मध्ये रूपांतरीत करता येईल. तसेच तुम्हाला 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईल असणे सुद्धा गरजेचे आहे. 4G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5G सेवा सुरू करता येणार नाही.

5G किंमत किती असेल?

5G सेवा ही 4G सेवेपेक्षा २० टक्क्यांनी महाग असू शकते. त्यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रम लिलावात मोठी रक्कम गुंतवली आहे. 5G मुळे तुम्ही काही सेकंदात चित्रपट डाऊनलोड करू शकता. जिओला 5G नेटवर्कच्या टेस्टमध्ये १००० एमबीपीएस पर्यंतचा स्पीड मिळाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.