पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पहिली 5G+ सेवा ‘या’ ठिकाणाहून सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात ५ जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ५ जी इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, भारतात रिलायन्स जीओ आणि एअरटेल यासारख्या टेलिकॉम कंपन्या ५ जी इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. भारतात प्रमुख १३ शहरात ५ जी सेवा सुरू होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील मुख्य मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. यानुसार, भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे.

(हेही वाचा – कोकण रेल्वे मार्गावर आणखी ‘या’ दोन गाड्या विजेवर धावणार!)

भारतातील आठ शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू करण्याची घोषणा यापूर्वी भारती एअरटेलने केली होती. आता टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायर कंपनी भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आपली ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे. राज्यात सुरू करण्यात आलेली ही पहिलीच ५ जी प्लस सेवा असणार आहे.

कंपनीकडून गुरूवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या हवाई प्रवाशांना या सेवेचा लाभ घेताल येणार आहे. लोहगावच्या संपूर्ण विमानतळ कार्यक्षेत्रात ही सेवा कार्यरत असणार आहे. ५ जी स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्वच ग्राहकांसाठी हायस्पीड डेटा वापरून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना सीम कार्ड बदलण्याची गरज नाही. ज्या ग्राहकांचे ४ जी सीम असेल तेच ५ जी साठी इनेबल असणार आहे. दरम्यान, यापूर्वी एअरटेलने देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये, दिल्ली, बंगळुरू, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी आणि गुरुग्राम विमानतळावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here