1 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

169

1 ऑक्टोबरपासून भारतात इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. भारतात 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होईल, असे एका अहवालातून सांगण्यात आले आहे. 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये फायदा होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: “…तर या घोषणाबाजीविरोधात रस्त्यावर उतरू, गरज वाटल्यास घरात घुसू”, नितेश राणे आक्रमक )

देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु

ऑगस्ट महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा उपलब्ध असेल.

सरकारच्या राष्ट्रीय ब्राॅडबॅंड मिशनने यासंदर्भात ट्वीट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.