अफगाणिस्तान आणि तजाकिस्तानमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी होती. एवढेच नाही तर चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागातही भूकंपाचा प्रभाव दिसून आला.
( हेही वाचा : “शरद पवारांना फडणवीसांची भीती वाटत होती म्हणून…” बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले )
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपांमुळे मोठा हाहाकार माजवला आहे अशावेळी हे धक्के बसले आहेत. अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी 6.07 मिनिटांनी भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र फैजाबादपासून 265 किमी अंतरावर आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने केलेल्या ट्विटनुसार, तजाकिस्तानमध्ये सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. चीनच्या सीमेजवळ भूकंपाचा प्रभाव दिसून आला आहे.
यासोबतच तुर्कस्तानमधील अँटिओक येथे स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजून 42 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी होती. गेल्या 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे दोन्ही देशांची परिस्थिती बिकट झाली होती. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 46 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे 2 लाखांहून अधिक अपार्टमेंट उद्ध्वस्त झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्की-सीरिया सीमेवर होता. अशा स्थितीत सीरियामध्ये भूकंपामुळे मोठी विध्वंस झाला असून, अजूनही हजारो लोक बेपत्ता आहेत.
Join Our WhatsApp Community