गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, 6 जणांचा होरपळून मृत्यू

165

गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील दहेज औद्योगिक परिसरात रविवारी रात्री उशिरा एका रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान सहा कामगारांचा मृत्यू झाला. ही एक ऑर्गेनिक कंपनी असून त्या कंपनीत मोठा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दहेज येथील ऑरगॅनिक केमिकल कंपनीच्या कारखान्यात पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. हा स्फोट झाल्यानंतर, परिसरात एकच धावपळ उडाली होती. हे ठिकाण अहमदाबादपासून सुमारे 235 किलोमीटर अंतरावर आहे.

हरपळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू

भरुचच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी सांगितले की, प्लांटमध्ये स्फोट झाला तेव्हा, सहा जण एका रिअॅक्टरजवळ काम करत होते. यावेळी अचानक सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर आग लागली. यात हरपळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. संबंधितांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच कंपनीत लागलेली आग विझळवण्यात आली आहे.

(हेही वाचा – भंगार व्यापा-यांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा उघड)

अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश

आग विझवण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचले आणि कारखान्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भरूचमधील दहेज औद्योगिक परिसरात एका केमिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये एक कामगार ठार झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.