गुजरातमधील आनंद जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार, ऑटो आणि बाईक यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला, ज्यामध्ये दुचाकीवरील दोन जण आणि ऑटोवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कार, ऑटो आणि दुचाकीची धडक
आनंद एएसपी अभिषेक गुप्ता यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, काँग्रेस आमदार केतन पडियार यांच्या जावईला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तहसीलमधील डाळी गावाजवळ घडला. तर आनंद येथे सायंकाळी सातच्या सुमारास कार, दुचाकी आणि ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ऑटोमधील चार जण आणि दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. तर कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, आमदार जावयाला अटक
ही कार काँग्रेस आमदार केतन पडियार यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. केतन पडियार हे काँग्रेसच्या आमदार पूनमभाई परमान यांचे जावई असल्याची माहिती मिळतेय. सध्या पोलिसांनी आमदार जावईविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आमदार जावयाला अटक केली आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदाराच्या जावयावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे.