मुंबईत गोवरमुळे सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू? वाचा काय आहे सत्य…

185

डिसेंबर महिन्यापासून मुंबईत गोवरचा उद्रेक होत कमी होत असताना मुंबईत आता पुन्हा गोवरमुळे बालकांचा मृत्यू होऊ लागला आहे. शुक्रवारी सहा महिन्यांच्या मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचा संशय पालिका आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. यंदाच्या आठवड्यात मुंबईत दोन बालकांचा गोवरमुळे बळी गेल्याचा संशय आहे. या दोन्ही बालकांच्या मृत्यूबाबत मृत्यू अहवाल समितीकडूनच निश्चितता येईल, असे स्पष्टीकरण पालिका आरोग्य विभागाने दिले.

नेमकी घटना काय?

ट्रॉम्बे येथील सहा महिन्यांच्या मुलीला ९ जानेवारीपासून सर्दी, खोकला आणि ताप येऊ लागला. वयोमर्यादेमुळे मुलीला गोवरप्रतिबंधात्मक लस दिली नव्हती. दोन दिवसानंतर तिच्या शरीरावर पुरळ येत तिची श्वसनक्रिया वाढली. पालकांनी दुस-या दिवशी मुलीला पालिका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मुलीची तब्येत गंभीर होत चालल्याने डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल केले. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आठवडाभर तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र मुलीची प्रकृती खालावत गेली. अखेरिस शुक्रवारी रात्री अकरा वाजता मुलीचा मृत्यू झाला. मृत्यूच्यावेळी मुलीला छातीत न्यूमोनिया झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मुंबईत गेल्या वर्षापासून २७२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला असून ७ बालकांचा संशयित मृत्यू झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.

(हेही वाचा आता संजय राऊतांचे निकटवर्ती सुजित पाटकरांचा स्टॅम्प पेपर घोटाळा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.