कोल्हापूर येथे शिवराज्याभिषेक दिनी, सोमवारी आपल्या मोबाईलवर औरंगजेब आणि टिपू सुलतानचा फोटो स्टेट्सवर ठेवल्याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. देशप्रेमी संघटनांनी आक्षेपार्ह स्टेट्सच्या विरोधात बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात १९ जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. दरम्यान याप्रकरणी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्यांना ६ जणांचा गजाआड करण्यात आल्याची माहिती, पालकमंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे.
कोल्हापूरमध्ये देशप्रेमी संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. पोलिसांनी असामाजिकतत्त्वांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. अशातच गृहमंत्रालयाने कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. तर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, औरंगजेबाचे स्टेट्स ठेवणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती केसरकर यांनी दिली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहेत. तर कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
(हेही वाचा – ‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही, कोण यांना फुस लावतंय? याची चौकशी करणार…’)
औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही, असे सांगत, जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, कोल्हापूर पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करा अशी सूचनादेखील दिली आहे. कुणी चुकीचे वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणा, असे निर्देश गृहविभागाने दिले आहेत. यासोबत खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांवरही बारीक नजर ठेवा अशी सूचनाही पोलिसांना देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community