इस्रोने भौगौलिक माहिती, प्रेरकशक्ती आणि रोबोटिक्स, एआर (संवर्धित वास्तव) आणि व्हीआर (आभासी वास्तव) या प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त 50 लाख रूपयांच्या सहाय्यता अनुदानासह 6 स्टार्टअपची निवड केली आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अटल नाविन्यपूर्ण संशोधन मिशन (एआयएम), नीती आयोग यांच्यासह इस्रोने एएनआयसी-अराईज-1.0 हा कार्यक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय महत्वाची क्षेत्रीय आव्हाने सोडवण्य़ासाठी तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण संशोधनांचा शोध, निवड, त्यांना समर्थन, पाठिंबा देणे आणि त्यांचे संगोपन करणे हा त्याचा उद्देश्य आहे.
(हेही वाचा – उदय सामंत हल्ला प्रकरण: आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी)
24 स्टार्ट अप्सपैकी 6 स्टार्ट अप्सची निवड
सिंह म्हणाले की, 24 स्टार्ट अप्सनी प्रस्ताव सादर केले होते आणि त्यापैकी 6 स्टार्ट अप्सची निवड करून त्यांना जास्तीत जास्त 50 लाख रूपयांचे सहाय्यता अनुदानासह समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. एएनआयसी-अराईज-1.0 स्टार्ट अप्सकडून प्रकल्प प्रस्ताव मिळवण्यासाठी तीन अंतराळ क्षेत्रीय आव्हानांचा विचार करत आहे. त्यात भौगौलिक माहिती प्राप्त करणे, प्रेरकशक्ती आणि रोबोटिक्स, संवर्धित वास्तव आणि आभासी वास्तव ही ती क्षेत्रे आहेत. एएनआयसी-अराईज-2.0 हा कार्यक्रम जीआयएस, प्रेरक शक्ती, पथ प्रदर्शन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच एम एल मॉडेलिंग या चार क्षेत्रांमध्ये तोडगे काढून अंतराळ क्षेत्रात त्यांचे उपयोजन करणे या आव्हानांसाठी सुरू करण्यात आला होता. या क्षेत्रांमध्ये स्टार्ट अप्सकडून प्रकल्पांचे प्रस्ताव मागवण्याचा त्याचा उद्देश्य होता. सर्व निवडलेल्या स्टार्ट अप्सना प्रत्येकी 50 लाख रूपयांचे सहाय्यता अनुदान देण्यात येणार आहे.