देशभरात तिरूपती बालाजीचे अनेक भक्त आहेत. या भक्तांकरता देशात विविध ठिकाणी तिरूपती मंदिरं आहेत. पण त्यांच्या भक्तांसाठी महत्वाची एक बातमी आहे. आंध्रप्रदेशातील तिरूमाला येथे असलेल्या व्यंकटेश्वरच्या प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरात १२ ही महिने भक्तांची मोठी गर्दी असते. मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर आणि ८ नोव्हेंबर रोजी तिरूमला येथे असणारे वेंकटेश्वर मंदिर आणि तिरूमला तिरूपती देवस्थानांतर्गत येणारी देशभरातली तब्बल ६० बालाजी मंदिरे बंद राहणार आहेत.
(हेही वाचा – शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परवानगी कोणालाच मिळणार नाही, ‘या’ भाजप मंत्र्यांचा दावा)
तिरूमला तिरूपती देवस्थानाच्या व्यवस्थापकिय मंडळाने २५ ऑक्टोबर आणि ८ नोव्हेंबर रोजी तिरूमला येथील वेंकटेश्वर मंदिरं आणि तिरूमला तिरूपती देवस्थानांतर्गत येणारी देशभरातली ६० बालाजी मंदिरं बंद राहणार असल्याचे जाहिर केलं आहे. ही सर्व मंदिरं २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणामुळे सलग १२ तास बंद राहणार आहे. तर ८ नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण असल्याने १२ तास बंद राहणार आहे.
तिरूमला तिरूपती देवस्थानाकडून भक्तांना कळविण्यात आले आहे की, मंदिराची शुध्दता प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भाविकासांठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. व्यवस्थापनाने सांगितले आहे की, व्हीआयपी दर्शन, श्रीवाणी ट्रस्ट लिंक्ड व्हीआयपी दर्शन, ३०० रूपयांचे स्पेशल दर्शन आणि इतर सर्व प्रिव्हिलेज्ड दर्शने या पाठोपाठ येणाऱ्या ग्रहणांच्या दिवसांत रद्द करण्यात आली आहेत. पण सांगितलेल्या कालावधीत सामान्य भाविकांना दर्शन घेता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community