हॉटेल ताजच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन व्यवसायिकाची आत्महत्या

148

मुंबईच्या कुलाब्यातील हॉटेल ताज या पंचतारांकित हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरून एका ६० वर्षाच्या व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण

शाहरुख इंजिनियर असे या व्यवसायिकांचे नाव आहे. शाहरुख इंजिनियर हे दुबई येथील प्रसिद्ध व्यवसायिक असल्याचे समजते, काही दिवसांपूर्वी ते मुंबईत आले होते. मुंबईतील कुलाबा येथील पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये शाहरुख इंजिनियर थांबले होते. शुक्रवारी दुपारी त्यांनी हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर उडी घेतली, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

(हेही वाचा – पर्यटनप्रेमींसाठी ४ दिवस विनामूल्य सहल! येथे करा नोंदणी, महाराष्ट्र पर्यटनाचा अनोखा उपक्रम)

कुलाबा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, इंजिनियर यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसले तरी त्यांनी आई वडिलांची शेवटची भेट घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख इंजिनियर हे राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीत कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट अथवा संशयास्पद सामुग्री आढळून आलेली नाही, शाहरुख इंजिनियर यांनी आत्महत्या का केली याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसानी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.