६० व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘सुवर्णतुला’ प्रथम

146

६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेत परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे), मुंबई या संस्थेच्या सं. सुवर्णतुला या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे आहेत.

( हेही वाचा : शिक्षणानंतरही होतोय अन्याय; म्हणून मागितला उच्च न्यायालयात न्याय )

स्पर्धेचे निकाल 

अमृत नाट्य भारती, मुंबई या संस्थेच्या सं. धाडीला राम तिने का वनी या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि अखिल चितपावन ब्राम्हण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी या संस्थेच्या सं. कटयार काळजात घुसली या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक यातिन माझिरे (नाटक-आरंभी स्मरीतो पाय तुझे), द्वितीय पारितोषिक घनश्याम जोशी (नाटक सुवर्णतुला), नाटयलेखन प्रथम पारितोषिक विलास कर्वे (नाटक-गोपिका रमणू स्वामी माझा), द्वितीय पारितोषिक यतिन माझिरे (नाटक-आरंभी स्मरीतो पाय तुझे), संगीत दिग्दर्शन प्रथम पारितोषिक शिवानंद दाभोलकर (नाटक-विठू आले माहेरा), द्वितीय पारितोषिक निळकंठ गोखले (नाटक-गोपिका रमणू स्वामी माझा), नेपथ्य प्रथम पारितोषिक अंकुश कांबळी (नाटक-तुका म्हणे आता), द्वितीय पारितोषिक सुधाकर घाणेकर (नाटक- सुवर्णतुला), संगीतसाथ ऑर्गन वादक : प्रथम पारितोषिक आनंद वैश्यमपायन (नाटक-गोपिका रमणू स्वामी माझा), द्वितीय पारितोषिक प्रसाद शेवडे (नाटक- मत्स्यगंधा), संगीतसाथ तबला वादक प्रथम पारितोषिक दत्तराज च्यारी (नाटक-विठू आले माहेरा), द्वितीय पारितोषिक प्रथमेश शहाणे (नाटक- सुवर्णतुला), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अभिजित केळकर (नाटक- आरंभी स्मरीतो पाय तुझे), जगन्नाथ आंगणे (नाटक- तुका म्हणे आता ), पियुषा तेंडोलकर (नाटक- मत्स्यगंधा), स्नेहल गुरव (नाटक- विटू आला माहेरा), उत्कृष्ट गायन रौप्यपदक विशारद गुरव (नाटक- सुवर्णतुला), स्वानंद भुसारी (नाटक-कटयार काळजात घुसली), दिव्या पळसुले-देसाई (नाटक मत्स्यगंधा), शारदा शेटकर (नाटक शिक्का कटयार), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे नम्रता काळसेकर (नाटक- गंधर्व गाथा), प्राजक्ता जोशी (नाटक- ययाति देवयानी), मनाली जोशी (नाटक कटयार काळजात घुसली), प्रियंका मुसळे (नाटक-तुका म्हणे आता), अपुर्वा ओक (नाटक- सूर-साज), गुरुप्रसाद आचार्य (नाटक-सुवर्णतुला), योगेश जोशी (नाटक- देवमाणूस), दशरथ नाईक (नाटक-विटू आले माहेरा), नितिन मतकरी (नाटक-धाडीला राम तिने का बनी), विपुल निमकर (नाटक-सुवर्णतुला ) गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सिध्दी ब्रोंदे (नाटक- धाडीला राम तिने का वनी), तन्वी गोरे (नाटक धाडीला राम तिने का वनी), स्वराप्रिया बेहरे (नाटक- कटयार काळजात घुसली), देवश्री शहाणे (नाटक सुवर्णतुला), वेदवती परांजपे (नाटक- आरंभी स्मरीतो पाय तुझे), साईश प्रभुदेसाई (नाटक-कटयार काळजात घुसली), दत्तगुरु केळकर (नाटक-विठू आले माहेरा), तनय पिंगळे (नाटक- धाडीला राम तिने का वनी), रोहन देशमुख (नाटक-धाडीला राम तिने का वनी), अजिंक्य पोंक्षे (नाटक- ययाती आणि देवयानी)

१० मार्च ते २७ मार्च २०२२ या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाटयगृह, रत्नागिरी येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून  मुकुंद मराठे, विजय कुलकर्णी,  विलास कुडाळकर,  ज्ञानेश पेंढारकर आणि अर्चना साने यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.