‘बेस्ट’च्या ताफ्यात कोरोनाची एन्ट्री! ६६ कर्मचाऱ्यांना बाधा

158

मुंबईत गेल्या पावणे दोन वर्षापासून कोरोना महामारीने मुंबईकर हैराण आहेत. यावेळी मार्च २०२० मध्ये मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यावेळी मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल पूर्णतः ठप्प होती. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले होते. आता याच बेस्टच्या ताफ्यात कोरोनाने शिरकाव केला आहे.

६६ पैकी ६ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

मुंबईकरांना परिवहन सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या ६६ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्याभरात कोविडची लागण झाल्याचे माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या ६६ पैकी ६ कर्मचाऱ्यांनी वेळीच योग्य उपचार घेतल्याने त्यांनी कोरोनावर मात केली आणि ते घरी परतले असून ६० कर्मचारी अद्यापही क्वारंटाईन आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. तर उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ६६ जणांमध्ये बेस्टच्या परिवहन विभागाअंतर्गत बस सेवा देणारे बस चालक, वाहक, वीज कर्मचारी, अधिकारी यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – एसटी महामंडळात भरती! ५५ हजार संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस)

सध्या ६० कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबईत डिसेंबर महिन्यात कोरोनाचा कहर आणखी वाढल्याचे दिसून आले. २७ डिसेंबरपासून आठवडाभरात बेस्टच्या ताफ्यातील ६६ चालक आणि इतर कर्मचारी कोरोना बाधित झाले. यापैकी केवळ ६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सध्या ६० कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत. तसेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत बेस्टमध्ये कार्यरत ३३ हजार अधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी ३ हजार ५६१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनावरील यशस्वी उपचारानंतर ३ हजार ४३५ अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली होती. तर ९७ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला होता. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडून ५० कोटी रुपये कोरोना योद्धा असलेल्या ९७ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याची माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.