प्रदूषण आणि हवामान बदलाचा परिणामाचा मोठा फटका प्राण्यांच्या अस्तित्वावर बसला आहे. प्राण्यांच्या अस्तित्वाचे सर्वेक्षण करत वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड (डब्ल्यू डब्ल्यू एफ ) या पर्यावरण प्रेमी संस्थेने झूओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनच्या अहवालाचा आधार देत ही माहिती उघडकीस आणली. या अहवालात 38 वर्षांत 69% पृथ्वीवरून प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व संपले. प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासाचा ऱ्हास, अधिवास क्षेत्रात इतर प्राणी-पक्ष्यांचा शिरकाव आदी कारणे मूक जणावरांच्या अस्तित्वावर उठली.
भारतातील सुंदरबन धोक्यात
जगभरात 0.13 टक्क्यांनी खारफूटींच्या जंगलाची कत्तल होत आहे. त्यापैकी भारतातील सुंदरबन वरही विकासाच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या कुऱ्हाडीची दखल अहवालात घेण्यात आली. 1985 पासून सुंदरबनमधील 135 चौरसमीटर जंगल बेचिराख झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
( हेही वाचा: देसाई, राऊतांनी चिठ्ठी दिली, तेव्हाच बाळासाहेबांविरोधातील खटला मागे घेतला; भुजबळांचा गौप्यस्फोट )
- लेटिन अमेरिका आणि केरेबीयन देश – 94% घट
- गोड्या पाण्यातील जलचर – 83 टक्के घट
- उष्ण कटीबंधातील देशांना हवामान बदलाचा मोठा फटका बसला.
- आफ्रिका – 66% घट
- आशिया पेसिफिक प्रदेश – 55% घट