मनोरंजन विश्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज, २२ जुलै रोजी घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात ‘पैठणी’चा सन्मान करण्यात आला असून मराठी विभागात गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटात ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली.
(हेही वाचा – गद्दार कोण? हे वरळी विधानसभेतील मतदारच सांगतील, राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल)
यंदाचा 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच या पुरस्कारात दरवर्षी हिंदी, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलगू, छत्तीसगढी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना नामांकन दिले जातात.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा किताब महाराष्ट्राला
यंदाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा किताब महाराष्ट्राला मिळाला आहे. शास्रीय गायक राहूल देशपांडेला पार्श्वगायनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘अवांचित’ आणि ‘गोदाकाठ’ या दोन मराठी सिनेमांसाठी किशोर कदम यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. नॉन फिचर्स फिल्ममध्ये कुंकूमार्चन या मराठी सिनेमाला पुरस्कार मिळाल आहे.
- अजय देवगण – सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सुमी – सर्वोत्कृष्ट बालचित्रपट
- फनरल (मराठी) सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी चित्रपट
- अनिश गोसावी – चित्रपट- टकटक
- आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर – चित्रपट- सुमी
- गोष्ट एका पैठणीची – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
- तानाजी : द अनसंग वॉरियर – सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट
- मनोज मुंतशीर (चित्रपट- सायना) सर्वोत्कृष्ट गीतकार
- राहुल देशपांडे (चित्रपट – मी वसंतराव) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म
- जून (मराठी)
- अभिनेता- सिदार्थ मेनन – गोदाकाठ (मराठी)
- अभिनेता- किशोर कदम – अवांचित (मराठी)
चित्रपटांसाठी सर्वाधिक पसंती मिळालेलं राज्य- मध्यप्रदेश