श्रीलंकेसारखे तब्बल 69 देश कंगाल; गृहयुद्ध भडकणार?

106

जगातील विकसनशील देश कर्जाच्या विळख्यात अडकले असून, यातून बाहेर पडण्याचा त्यांचा मार्ग दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. श्रीलंकेसह जगभरातील तब्बल 69 देशांवर कंगाल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, लेबनान, ट्युनिशियासह दोन डझनपेक्षा अधिक देशांत युक्रेन संकट आणि महागाईमुळे वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ, अन्नधान्य टंचाई, बाजारातील घसरणीसह भयंकर बेरोजगारी यामुळे गृहयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.

70 देशांना यावर्षी 11 अब्ज डाॅलरपेक्षा अधिक विदेशी कर्जाचे हफ्ते द्यावे लागणार असून, तिजोरी रिकामी असल्याने, हे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

या देशांना अधिक धोका

  • इजिप्त – युक्रेन संकटामुळे अन्नधान्याच्या तुटवडा, केवळ 3 महिन्यांचा गहू शिल्लक
  • ट्यूनिशिया– विदेशी कर्ज देशाच्या जीडीपीपेक्षा 100 टक्केपेक्षा अधिक. महागाई 7 टक्क्यांपेक्षा अधिक, गृहयुद्धाची भीती.
  • लेबनान– बेरुत स्फोटात देशातील सर्वात मोठा धान्याचा साठा नष्ट, अन्नधान्याच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या. चलनाची किंमत 90 टक्क्यांनी घटली. कर्ज जीडीपीपेक्षा 360 टक्के अधिक.
  • अर्जेंटिना– 9 वेळा विदेशी कर्जाचे हफ्ते भरण्यास असमर्थ

हे देशही करताहेत संघर्ष …

  • अल- सल्वाडोर, पेरु, इथियोपिया, घाना, केनिया, तुर्की आणि दक्षिण आफ्रिकेवर कर्जामुळे कंगाल होण्याची वेळ आली आहे.
  • या देशांवर विदेशी कर्ज जीडीपीच्या 70 ते 100 टक्के इतके वाढले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच शिल्लक नाही.
  • त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची याचना केली आहे.

( हेही वाचा: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा)

….म्हणून जगभरातून या देशांना मदत मिळेना

  • कोरोना महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये मंदी, कर्ज घेण्याचा खर्च वाढला, व्याज दर वाढल्याने कर्ज घेणे महागले.
  • रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यपदार्थ, तेल, धातू महागले, युद्धामुळे पुरवठा साखळी उद्ध्वस्त

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.