ज्येष्ठ नागरिकांकडून मरणोत्तर जीवनदान!

परळच्या ग्लोबल रुग्णालयात ज्येष्ठ व्यक्तीकडून मरणोत्तर अवयवदान करण्यात आले. सत्तरीत पोहोचलेल्या ज्येष्ठाकडून झालेले हे सलग दुसरे अवयवदान आहे. 69 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांची दोन्ही मूत्रपिंडे दान केली.
या अवयवदानानंतर मुंबईतील अवयवदानाची यंदाच्या वर्षांतील आकडेवारी तिशीपर्यंत पोहोचली. 30 पैकी आतापर्यंत एकाच सत्तरीपार व्यक्तीकडून अवयवदान झाले आहे. ऐन सत्तरी पूर्ण झालेल्या केवळ तीन रुग्णांचे अवयवदान झाले आहे. त्याखालोखाल ग्लोबल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या 69 वर्षीय वृद्धाकडून अवयवदान झाले. रविवारी, 18 सप्टेंबरला हे अवयवदान करण्यात आले. मात्र, याबाबत रुग्णाला झालेल्या आजार आणि मृत्यूच्या कारणांविषयी ग्लोबल रुग्णालयाने माहिती दिली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here