कायम वादात राहणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) डाव्या विद्यार्थी संघटनांनी पुन्हा नवी कुरापत केली आहे. अॉल इंडिया स्टुडंट असोसिएशन (आयसा) या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित विद्यार्थ्यांनी सोमवारी, ६ डिसेंबरच्या रात्री बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच यात प्रामुख्याने बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीची घोषणाबाजी करण्यात आली.
बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीची मागणी
विद्यापीठातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबरच्या रात्री जवाहरलाल नेहरु विद्यापीठात निषेध मोर्चा काढला होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली, त्याविरोधात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आणि डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीची मागणी केली.
( हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे ओबीसींच्या 400 जागांवर परिणाम )
जेएनयूत निषेध मोर्चे
आयसा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘नही सहेंगे हाशिमपुरा, नही करेंगे दादरी, फिर बनाओ बाबरी’, अशा घोषणा दिल्या, बाबरी पाडण्याच्या घटनेला २९ वर्षे पूर्ण होत असताना या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनेने निषेध मोर्चा काढला होता. जेएनयू कॅम्पसमधील गंगा ढाब्यावर सोमवारी रात्री 8.30 वाजता डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी या निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष साकेत मून यांनी भाषण दिले. यावेळी मून यांनी आपल्या भाषणात बाबरी मशिदीची पुनर्बांधणी करुन न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगितले.
Join Our WhatsApp Community