निवडणुकीत वाटल्या जाणाऱ्या नोटा झाल्या जप्त!

168

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकत्याच ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून ४ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही जण विविध राज्यात राहणारे असून त्यापैकी एक जण अभिनेता असल्याची माहिती समोर येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात छपाई करण्यात आलेल्या बनावट नोटा, या ज्या राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत त्या ठिकाणी या नोटांचे वितरण करण्यात येणार असल्याचे चौकशीतून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Crime Branch Dahisar

( हेही वाचा : बूस्टर डोस प्रभावी आहे की नाही? तज्ज्ञांच्या मनात शंका! )

७ कोटीच्या बनावट नोटा 

वसीम बुंदु सलमानी (२९), मनोज शर्मा (३९), सुमित उर्फ सॅम यशपाल शर्मा (३२) आणि विनोद विजयन (३९) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. वसीम हा उत्तरप्रदेश, मनोज हा प्रतापगड दिल्ली, सुमित हा अभिनेता असून उत्तराखंड आणि विनोद विजयन हा केरळ या राज्यात राहणारा आहेत. या चौघांना दहिसर पूर्व चेक नाका येथून मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ च्या अधिकाऱ्यांनी एका भाड्याच्या टॅक्सीतून ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असणारी बॅग तपासली असता त्यात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा असलेले एकूण ७ कोटी रुपये सापडले. पोलिसांनी या नोटा जप्त करून तपासल्या असता या नोटा बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने या चौघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांकडून या व्यतिरिक्त मोबाईल फोन, विविध बँकांचे क्रेडिट, डेबिट कार्ड, व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले चौघे अंधेरी येथून मुंबई बाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. तेथून पुढे या बनावट नोटांचे वितरण निवडणुका सुरू असलेल्या राज्यात करण्याची या चौघांची योजना होती अशी माहिती तपासात समोर येत आहे. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संग्राम निशानदार यांनी दिली.

( हेही वाचा : १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीत सुवर्ण संधी! २,७८८ रिक्त… )

अशा आहेत बनावट नोटा ……

पोलिसांनी जप्त केलेल्या नोटाचा रंग काही ठिकाणी फिक्कट तर काही ठिकाणी अति गडद असून नोटांचा कागद खऱ्या नोटांच्या तुलनेत अत्यंत साधा पेपर वापरण्यात आला आहे, नोटावरील गांधीजीच्या प्रतिमेवर वॉटरमार्क नसून नोटांवर अधिकृत सिक्युरिटी मार्क नसल्यामुळे या नोटा कलर झेरॉक्स करण्यात आलेल्या असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.