पासपोर्ट प्रकरण! एकाच पोलीस ठाण्यातील ७ जणांची बदली 

150
पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या नागरिकांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी कांदिवली पूर्वेतील समता नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ७ जणांची तडकाफडकी सशस्त्र विभागात बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्यांपैकी ३ अधिकारी आणि ४ अंमलदाराचा समावेश आहे.
नागरिकाने केली थेट आयुक्तांकडे केली तक्रार
कांदिवली पूर्वेतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नागरिकाला काही दिवसांपूर्वी पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी  बोलवण्यात आले होते. व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या नागरिकासोबत पोलिसांनी गैरवर्तन केले गेले, मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी या नागरिकाने मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे ट्विटरवर तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि ४ पोलीस अंमलदार असे एकूण ७ जणांची सशस्त्र विभागात बदली केली आहे. एकाच पोलीस ठाण्यातील सात जणांची एकाचवेळी बदली केल्यामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.