लडाखमध्ये लष्कराचं वाहन खोल नदीत कोसळलं, ७ जवानांचा अपघाती मृत्यू

142

भारतीय लष्करासंबंधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळलं. या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर जवानांची त्वरीत सुटका करण्यात आली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थॉईसपासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास झाला आहे.

इंडियन आर्मीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २६ जवान सैनिकांची एक तुकडी परतापूरच्या हनीफ सेक्टरवरून फॉरवर्ड पोस्टला जात होती. लडाख प्रदेशात २५ सैनिकी जवानाना घेऊन जाणारे वाहन गुरूवारी श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवान मृत्यूमुखी पडले आणि इतर जवान गंभीर जखमी झाले आहेत.

इतर जवानही गंभीर जखमी झाल्याने या जखमींना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना हवाई मार्गाने हलवण्यात येत आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. लेहवरून परतपूरसाठी सैन्याच्या सर्जिकल टीम रवाना करण्यात आल्या आहेत. गंभीर जवानांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमानच्या रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.