हरियाणामध्ये गणेश विसर्जन करताना विविध घटनांमध्ये 7 जणांचा बुडून मृत्यू

हरियाणातील महेंद्रगड आणि सोनीपत येथील दोन विविध घटनांमध्ये शुक्रवारी 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी सोनीपत येथे तिघांचा तर महेंद्रगडमध्ये चौघे मृत्यूमुखी पडले आहेत. या दोन्ही घटनांमधील लोक गणेश विसर्जनासाठी गेले होते.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, सोनपतमधील मिमारपूर घाटावर एक व्यक्ती आपला मुलगा आणि पुतण्यासोबत गणपतीच्या विसर्जनासाठी गेला होता. या लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर महेंद्रगडमधील कनिना-रेवाडी मार्गावरील झगडोली गावाजवळील कालव्यावर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले सुमारे 9 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. रात्री उशिरा 8 जणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. महेंद्रगड येथील झगडोली गावाजवळील गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुमारे 20-22 जण कालव्यावर गेले होते. यादरम्यान अनेकांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत 4 मुलांना जीव गमवावा लागला असून 4 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. विसर्जनादरम्यान झालेल्या घटनांवर दु:ख व्यक्त करताना हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, महेंद्रगड आणि सोनीपत जिल्ह्यात विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे. दरम्यान उत्तरप्रदेशातही गणेश विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

( हेही वाचा: हे तर भोंदू हृदयसम्राट…; अतुल भातखळकरांची खोचक टीका )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here