रेल्वेकडून राज्यांना 4 हजार 700 विलगीकरण डब्यांचा ताफा

सध्या 4 हजार 700 खाटांची व्यवस्था असलेले 298 विलगीकरण सुविधा डबे कोविड रुग्णांवरील उपचारासाठी राज्य सरकारांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

कोविड विरोधातील कठोर लढ्यात सहभागी होत रेल्वे मंत्रालय संबंधित राज्यांच्या मागणीला प्रतिसाद देत, त्या-त्या राज्यांमध्ये विलगीकरण सुविधा असलेले रेल्वेचे डबे तातडीने पोहोचवसाठी तसेच या सुविधेशी संबंधित कर्मचारी वर्ग आणि सामान यांची तरतूद करत जलदगतीने कृती करत आहे. रेल्वे विभागाने विलगीकरण कक्षाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी 70 हजार खाटांची सोय असलेला 4 हजार 400 विलगीकरण डब्यांचा ताफा वापरासाठी उपलब्ध करुन दिला आहे.

पालघर येथे 21 डबे कार्यान्वित

विविध राज्यांच्या मागणीनुसार, सध्या 4 हजार 700 खाटांची व्यवस्था असलेले 298 विलगीकरण सुविधा डबे कोविड रुग्णांवरील उपचारासाठी राज्य सरकारांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाशी केलेल्या करारातील अटींना अनुसरुन पालघर येथे आता रेल्वे विभागाकडून वैद्यकीय उपचारासाठी 21 डबे कार्यान्वित करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून या डब्यांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर्सचे दोन संच देखील पुरवण्यात आले आहेत.

(हेही वाचाः सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीचे ‘असे’ केले वर्गीकरण!)

महाराष्ट्राला अशी मिळाली मदत

महाराष्ट्रात, नंदुरबार येथे गेल्या 2 दिवसांत 10 नवे रुग्ण दाखल झाले, तर यापूर्वी विलगीकरण सुविधेचा लाभ घेत असलेल्या 10 रुग्णांना घरी सोडण्यात आले. याठिकाणी सध्या 26 कोविडग्रस्त उपचार घेत आहेत. आतापर्यंत, एकूण 114 रुग्ण इथे दाखल झाले. तर राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी उपचारानंतर 88 जणांना घरी पाठवले. रेल्वे विभागाने नागपूर येथील अजनीच्या मालडेपो स्थानकात 11 कोविड सुविधा डबे उभे केले असून, त्यापैकी एक डबा केवळ आरोग्य कर्मचारी आणि सामानासाठी आरक्षित आहे. हे डबे नागपूर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. या ठिकाणी 9 रुग्ण दाखल करण्यात आले आणि 6 रुग्ण उपचाराअंती घरी पाठवण्यात आले.

(हेही वाचाः नांदेडमध्ये शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू होणार!)

विविध राज्यांमध्ये रेल्वेने व्यवस्था कलेल्या या कोविड सुविधा डब्यांमध्ये ताज्या नोंदणीनुसार, एकूण 177 रुग्ण दाखल झाले, तर 117 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. सध्या 60 कोविड रुग्ण या विलगीकरण सुविधेचा लाभ घेत आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here