देश ८०० वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलाय, स्वातंत्र्य टिकवण्याचा निर्धार करा! रणजित सावरकर यांचे आवाहन

128

आपला देश मुघल काळापासून ८०० वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडला आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवायचे आहे. निर्धार पक्का ठेवा. आजच्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जन वंदे मातरम, राष्ट्रभक्तीच्या घोषणा देताे आणि संध्याकाळी विसताे, असे करु नका. हा जोश कायम ठेवा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५व्या वर्षात आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपण निर्धार करून या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात लक्षात ठेवले पाहिजे की, ब्रिटीश आपल्यावर १५० वर्षे राज्य करत होते. आपला खरा स्वातंत्र्यलढा १८५७ ला सुरू झाला, याला ९० वर्षे झाली. आज देशाच्या स्वातंत्र्याला केवळ ७५ वर्षे झालेली आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली, तर आपल्यातच फूट पडत आहे. हा कट आहे आपण सावध राहिले पाहिजे, असेही रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह दिनदर्शिका सर्वांसाठी उपलब्ध)

26Jan 1

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित या महत्वाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. सुबोध पाठक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्निल सावरकर तसेच स्मारकाच्या विविध उपक्रमाचे पदाधिकारी, सावरकर स्मारकाचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.

यापुढे सावरकरद्वेष्ट्यांना कायदेशीर धडा शिकवणार…

वीर सावरकर यांचा सावरकरद्वेष्टे कायम अवमान करत असतात. त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जातात. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने याविरोधात कडक धोरण स्वीकारले आहे. अशा सावरद्वेष्ट्यांना कायदेशीररीत्या धडा शिकवण्यासाठी विधी विभागाची स्थापना करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित या विभागाची घोषणा करण्यात आली. या विभागाचे प्रमुख अॅड. सुबोध पाठक हे असणार आहेत.

…तरचं अंतर्गत शत्रू विरघळून जातील

आपण ज्या वटवृक्षाच्या सावलीखाली उभे आहोत तिथून माझी काही वेगळी ओळख करुन द्यायला नको, असे सांगत प्रमुख अतिथी अॅड. सुबोध पाठक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. हल्लीच्या काळात आपण देशभक्ती इंटरनेटवर आणि कागदावरच ठेवतो. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी आपली देशभक्ती उफाळून येते. आपल्या भारतात अनेक अंतर्गत शत्रू आहेत. जेव्हा भारतातील प्रत्येक नागरिक देशाचा सैनिक होईल, तेव्हाच शत्रूराष्ट्र आणि अंतर्गत शत्रू विरघळून जातील, असेही अॅड. सुबोध पाठक यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.