राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; यंत्रणा सज्ज, राज्यात अलर्ट जारी

156

प्रजासत्ताक दिन ( Republic Attack 2023) अगदी दोन दिवसांवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ( Terror Attack) 26 जानेवारीला देशाच्या कोणत्याही राज्यात दहशतवादी सर्वात मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( Maharashtra Attack Threat)

या दहशतवादी संघटनांकडून हल्ला होण्याची शक्यता

देशात G20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. लष्कर- ए- तैयबा, जैश- ए- मोहम्मद, आयसीसशी संबंधित संघटना अकीस, जमात- उल- मुजाहिद्दीन या संघटना हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना नेहमीप्रमाणे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयची साथ आहे, अशी माहिती समोर येत आहे.

( हेही वाचा लडाखच्या दुर्गतीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी ‘थ्री इडीअट्स’मधील ‘रिअल रँचो’ करणार उपोषण )

‘हे’ अधिकारी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

देशातले बडे राजकीय नेते, सैन्यदल, पोलीस अधिकारी हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. आयईडी, ड्रोन यांद्वारे सैन्यदल, पोलिसांच्या वाहनांवर हल्ल्यांची शक्यता आहे. तसेच, परदेशी नागरिकांना लक्ष्य करुन G20 परिषदेत खोडा घालण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. हल्ला नेमका कशाप्रकारे होईल याची माहिती सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.