आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा केला जातो. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिकेवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन ही ऐतिहासिक इमारत आहे. या इमारतीवर तिंरगा रोषणाई करण्यात आली आहे. रंगबेरंगी रोषणाईने सजलेले पाण्याचे कारंज लक्ष वेधून घेत आहेत.
( हेही वाचा: २६ जानेवारीपासून रेल्वेतील जेवणाचा मेनू बदलणार! भेळपुरी, मोमोजसह प्रवाशांना मिळणार हे १० प्रादेशिक पदार्थ )
इंद्रभवन इमारत ही 100 वर्षे जुनी
सोलापूर महानगर पालिकेची इंद्रभवन ही इमारत जवळपास 100 वर्षे जुनी आहे. नुकतेच या इमारतीच्या संवर्धनाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे इमारतीचे मूळ वैभवशाली अधिकच सुंदर दिसत आहे. त्यातच आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने इंद्रभवन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Join Our WhatsApp Community