भायखळा येथील खासगी रुग्णालयात ७५ वर्षीय परदेशी रुग्णावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शरीरातील महाधमनी अरुंद झाल्याने रुग्णाची प्रकृती बिघडली होती. रेडिओलॉजिस्ट डॉ. अशोक बन्सल यांनी ही अवघड शस्त्रक्रिया करून रुग्णाला नवे जीवनदान दिले. हाशिम इमराह अल फदिली असे या ७५ वर्षीय रुग्णाचे नाव आहे.
७५ वर्षीय रुग्ण इराकमधील रहिवासी आहेत. रक्तदाब कमी झाल्याने रुग्ण बेशुद्ध झाला होता. बेशुद्ध अवस्थेतच रुग्णाला तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी रुग्णाची महाधमनी अरुंद झाल्याचे निदान केले. तेथील रुग्णालयात महाधमनीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्टेन्ट ग्राफ्टिंग तंत्र जाणणारे डॉक्टर्स नसल्याने रुग्ण भारतातील मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल झाला.
(हेही वाचा – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन)
तीन स्टेन्ट ग्राफ्ट आणि डाव्या मूत्रपिंडात एक स्टेन्ट असे एकूण चार स्टेन्ट टाकण्यात आले. डाव्या हातातून डाव्या मूत्रपिंडात एक स्टेन्ट टाकण्यात आली. यामुळे डाव्या किडनीचे कार्य व्यवस्थितरित्या सुरु झाले. सामान्यत पायातून हा स्टेन्ट टाकला जातो. मात्र रुग्णाच्या शरीरातून हातातून टाकला जातो. मात्र या रुग्णाच्या शरीरात हातातून स्टेन्ट टाकण्यात आले. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी रुग्ण चालू-फिरू लागला. तीन दिवसानंतर हाशिम इमराह अल फदिली याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community