यंदा देशभरात ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. राजधानी दिल्लीतही ही तयारी सुरू असून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा यंत्रणांनी १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट दिलाय. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत आयईडी किंवा ड्रोन हल्ला होण्याची शक्यता आहे. दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये ड्रोनद्वारे हल्ल्याचा अभ्यास करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट दिला असून सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी हल्ल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना अनेक प्रकारच्या हल्ल्यापासून सावध राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहिला इशारा हा ड्रोन हल्ल्याचा आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ड्रोन हल्ल्याचे प्रशिक्षण घेत आहे, असे या अलर्टमध्ये सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – LPG सिलिंडरच्या खाली ‘ही’ छिद्रे का असतात? तुम्हाला माहितीये? वाचा काय आहे कारण)
दरम्यान, देण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अलर्टनुसार दहशतवादी यावेळी मेटल डिटेक्टरला चकवा देणाऱ्या सोफेस्टिकेटेड आयईडीचा वापर करण्याची शक्यता आहे. या अलर्टमुळे आता सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांकडून सर्वच ठिकाणी चेकिंग करण्यात येत असून दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदीही वाढवण्यात आल्याची माहिती मिळतेय.
Join Our WhatsApp Community