पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाला लाल किल्ल्यावर खास फेटा घालून ध्वजारोहण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 75व्या अमृत महोत्सवी राष्ट्रध्वजाच्या रंगांचा समावेश असलेला फेटा परिधान केला होता. त्याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून परिधान केलेल्या खास फेट्यांचे क्षणचित्र पाहुया.
2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी पांढरा हाफ बाही असलेला खाती कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. यासोबतच त्यांनी भगवा आणि हिरवा जोधपुरी बांधेज फेटा बांधला होता.
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तसेच त्यावर खादी जॅकेटही घातले होते. मोदींनी केशरी बांधणीचा फेटा बांधला, ज्यावर लाल आणि हिरवे पट्टे होते.
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढरा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. तसेच, गुलाबी रंगाचा फेटा यावेळी पंतप्रधानांनी परिधान केला होता.
2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाफ बाही कुर्ता परिधान केला होता. यावर्षी पंतप्रधानांनी चमकदार लाल आणि पिवळा फेटा घातला होता.
2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुल बाह्यांचा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यासोबतच त्यांनी उपरणेही घातले होते. यावर्षी पंतप्रधानांनी गडद भगवा आणि लाल फेटा घातला होता.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाफ बाह्यांचा कुर्ता परिधान केला होता. त्यावर पंतप्रधानांनी पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचा लेहेरिया पॅटर्न असलेलला फेटा घातला.
2020 सालाबद्दल बोलायचे तर त्यांनी भगवा आणि क्रीमकरलची टोपी घातली होती. पंतप्रधानांना हाफ बाही असेलेला कुर्ता, फेट्यावर पांढरी किनार असलेला भगवा रंगाचा फेटा घातला होता.
2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगव्या रंगाचा फेटा घातला होता. या फेट्याचा रंग व कुर्त्यांचा रंग मॅच होत होता.