चिंता वाढली! शुक्रवारीही ओमायक्रॉनचे रुग्णांची नोंद, बघा आजची आकडेवारी

125

तिसरी लाट जवळपास आटोक्यात आलेली असताना राज्यभरात वाढलेल्या ओमायक्रॉनच्या तपासणीत आता सलग दुस-या दिवशी ओमायक्रॉन विषाणूची बाधा असलेले नवे रुग्ण आढळून आले. यात पुण्यात, सिंधुदुर्गात आणि वर्ध्यात सलग दुस-या दिवशीही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या नव्या ७६ रुग्णांची नोंद झाली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने या रुग्णांचा अहवाल तपासल्यानंतर रुग्णांमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आता राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ५३१ वर पोहोचली आहे.

ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांचा तपशील 

पुणे शहर – ४६
अमरावती – १२
जालना – ८
पुणे ग्रामीण – ४
वर्धा- ३
सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि इतर राज्य – प्रत्येकी १

(हेही वाचा – औरंगाबादेतल्या शेतक-याला मोदींनी पाठवले 15 लाख! तुमचं अकाऊंट तपासा)

तपासणी अहवालातील आकडेवारी

राज्यात ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी केल्या जाणा-या जनुकीय अहवालासाठी आतापर्यंत ८ हजार २६२ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी केवळ ३ हजार ५३१ रुग्णांमध्येच ओमायक्रॉनचा विषाणू आढळला. एकूण तपासलेल्या नमुन्यांपैकी ५० टक्के रुग्णांना ओमायक्रॉन झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. यापैकी १ हजार ३०६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

राज्यात आता केवळ ६०, ९०२ सक्रीय रुग्ण

राज्यात आता केवळ ६० हजार ९०२ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी ५ हजार ४५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसांत १४ हजार ६३५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता ९७.३४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

दहा हजारांच्या खाली रुग्णसंख्या असलेले जिल्हे

नागपूरमधील कोरोना संख्या आता ९ हजार ४०० रुग्णांवर खाली उतरली आहे. त्याखालोखाल अहमदनगरमध्ये सध्या ५ हजार २८५ कोरोनाच्या रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. नाशिक आणि रायगडमध्येही घट कायम आहे. नाशकात २ हजार ४६८ तर रायगडमध्ये १ हजार २९७ सक्रीय कोरोनाचे रुग्ण नोंदवल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर मुंबईत आणि ठाण्यातील नोंदी पाच हजारांच्याही खाली उतरल्या आहेत. मुंबईत ३ हजार २९९ तर ठाण्यात ३ हजार ७२ रुग्ण उरले आहेत. पुण्यात ओमायक्रॉनच्या केसेसमध्ये वाढ होत असताना पुण्यातील रुग्णसंख्या अद्यापही फारशी कमी झालेली नाही. एकट्या पुण्यातच १७ हजार ३४३ कोरोनाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.