INS तरकश सातव्या संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सरावात सहभागी

105

भारतीय, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलांमधील सातव्या संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सरावाचे 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील ग्रीकुरिया (पोर्ट एलिझाबेथ) येथे आयोजन करण्यात आले होते. या सरावात भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व फ्रिगेट क्षेपणास्त्र, आयएनएस- तरकश, चेतक हेलिकॉप्टर आणि मरीन कमांडो फोर्सच्या जवानांनी केले.

सागरी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धिंगत करणे, संयुक्त लष्करी परिचालन प्रशिक्षणाला चालना देणे, समान सागरी धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्जता, सागरी क्षेत्रातील दळणवळण दृढ करणे आणि आंतरकार्यक्षमता निर्मिती मजबूत करणे हा या संयुक्त सरावाचा उद्देश होता. सातव्या संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सरावाचा उद्घाटन समारंभ 11 ऑक्टोबर रोजी झाला. तीन दिवस चाललेल्या या सरावात बंदर आणि समुद्र या दोन्ही स्थानांवरच्या टप्प्यांचा समावेश होता.

(हेही वाचा – भाजपा नेते अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “…असेही सांगून टाकायचे”)

बंदरावरील टप्प्यात 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक देवाणघेवाण, जसे की क्षति नियंत्रण आणि अग्निशमन कवायती, व्हीबीएसएस (VBSS)/क्रॉस बोर्डिंग व्याख्याने आणि सैन्यांमधील परस्परसंवाद यांचा समावेश होता, सागरी सराव टप्पा 12 ऑक्टोबर रोजी झाला. सागरी परिचालनाच्या विस्तृत पैलूंचा समावेश होता. संक्षिप्त माहितीपर कार्यक्रम आणि समारोप समारंभ गेब्राह बंदराजवळ भारतीय नौदलाच्या तरकश जहाजावर आयोजित करण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.