7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 3 हप्त्यांत मिळणार DA थकबाकी

143

लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना येत्या नवं वर्षात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्त्याची 18 महिन्यांची थकबाकी देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र याबाबत एकमत होत नसल्याचे दिसून येत होते. मात्र आता नवीन वर्षाच्या निमित्ताने सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय येण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – समृद्धी महामार्गावर कोणत्या वाहनांसाठी किती असणार टोल? बघा 2031 पर्यंतच्या Toll Rate ची यादी)

कर्मचारी आणि पेन्शनर्स युनियनच्या प्रतिनिधींनी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीच्या मागणीसंदर्भात कॅबिनेट सचिवांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यादरम्यान थकबाकीबाबतची चर्चा कितपत पुढे सरकली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता आणि कर्मचाऱ्यांची थकबाकी यावर चर्चा होणार आहे.

३ ते ४ टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता!

अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्मचारी संघटनांच्या मागणीवरही सरकारकडून सकारात्मक असल्याचे संकेत आहेत. याशिवाय जानेवारी 2023 चा भत्ताही 3 ते 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत पीएम किसानचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यावरही शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे. सरकारने यापूर्वी 18 महिन्यांच्या DA थकबाकीसाठी नकार दिला होता. मात्र या चर्चेनंतर याबाबत एकमत होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

18 महिन्यांपासून महागाई भत्ता प्रलंबित

कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत महागाई भत्ता (DA) मिळालेला नाही. या दीड वर्षात सरकारने डीएम 11 टक्के वाढवला होता मात्र त्याचे हफ्ते गोठवले होते. कर्मचाऱ्यांच्या मते, सरकारने कर्मचाऱ्यांचे पैसे रोखू नयेत, हे न्यायालयानेही मान्य केले आहे. हा त्यांचा हक्क असून थकबाकीच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.