7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसऱ्यांदा वाढ होणार!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय म्हणजेच सराकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात अनेक प्रकारचे फायदे मिळतात. तसेच आता या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) दुसऱ्यांदा वाढ होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता ४ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात येणार आहे. १ जुलै २०२२ पासून या वर्षाच्या महागाई भत्त्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली जाईल, असा अंदाज या आधी वर्तविण्यात येत होता. आता औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अलीकडील आकडेवारीनंतर महागाई भत्ता ४ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत वाढविला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासोबतच असाही होणार फायदा, कोणाला मिळणार लाभ?)

महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ!

सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ३४ टक्के महागाई भत्ता देण्यात येतो. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची अपेक्षा होती. मात्र आता या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. एप्रिल महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकांच्या आकडेवारीनुसार हा अंदाज वर्तविला जात आहे.

…तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

असेही सांगितले जात आहे की, देशातील वाढती महागाई लक्षात घेता, जुलै महिन्यात केंद्र सरकार महागाई भत्ता वाढविण्याचा विचार केला जात आहे. असे जर झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. जर केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांपर्यंत वाढवला तर केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ८ हजार रुपयांवरून २७ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.  वाढत्या महागाईसह ईएमआयही महाग होत आहे, अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ जर झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. साधारण १ जानेवारी आणि १ जुलैपासून महागाई भत्ता वाढवताना दिसत आहे. त्यामुळे आता देखील केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता वाढणार की नाही याची आतुरतेने याची वाट पाहत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here