सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय म्हणजेच सराकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात अनेक प्रकारचे फायदे मिळतात. गेल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तर अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने म्हणजेच 34 % इतका आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर देण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – फुटीर आमदारांच्या विरोधात रस्त्यावरील लढाईत ‘सेने’च्या रागिणी राहणार आघाडीवर!)
लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
राज्य सरकारने 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) थकबाकी भत्याचा तिसरा हप्ता देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीच सरकारने याचे 2 हप्ते दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा महाराष्ट्र सरकारच्या सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. दरम्यान, हा तिसरा हप्ता या महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात 2019 मध्ये राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. यानंतर, सरकारने निर्णय घेतला की, 5 वर्षांत आणि 2019-20 वर्षापासून पाच हप्त्यांमध्ये कर्मचार्यांना त्यांच्या भत्याची थकबाकी दिली जाईल. याअंतर्गत आतापर्यंत कर्मचाऱ्यांना 2 हप्ते मिळाले आहेत. आता तिसरा हप्ता देण्यात येणार आहे.
कोणाला किती लाभ मिळणार
शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारी कर्मचार्यांमध्ये अ गटाच्या अधिकाऱ्यांबद्दल सांगायचे झाले तर त्यांना 30 ते 40 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर गट ब अधिकाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत क गटातील लोकांना 10 ते 15 हजार रुपये आणि चौथ्या श्रेणीतील लोकांना 8 ते 10 हजार रुपये मिळतील. तर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना 31% DA चा लाभ देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community