सरकारने बोनस आणि महागाई भत्त्यामध्ये वाढ करून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहेय परंतु या दरम्यान केंद्र सरकारने नवा आदेश जारी केला आहे. कर्मचारी आणि प्रशिक्षण मंत्रालयाने एक किंवा त्यापेक्षा जास्त गुन्ह्यांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हा नियम सातव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! १८ महिन्यांची DA थकबाकी लवकरच मिळणार?)
कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने (DoPT) ऑफिस मेमोरॅंडम जारी केले आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यावर दंडाची पहिली कारवाई सुरू असताना दुसरी कारवाई केली जाऊ शकते. संबंधित कर्मचाऱ्यांना शिक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात स्पष्टपणे लिहावे की, एका कर्मचाऱ्याला एकाचवेळी २ दंड ठोठावण्यात येत आहेत तसेच दोन्ही शिक्षा होतील असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच यामध्ये दोन्ही शिक्षा एकाचवेळी चालतील की एक संपल्यानंतर दुसरी लागू होईल हे सुद्धा स्पष्ट करावे असे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
प्रवास भत्त्याच्या नियमांमध्ये दिलासा
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्याशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ईशान्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख किंवा अंदमान आणि निकोबारच्या हवाई प्रवासासाठी सीसीएस नियम १९८८ अंतर्गत कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली असून या अंतर्गत २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत केंद्रीय कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
Join Our WhatsApp Community